गांजाची तस्करी करणार्‍या सराईत गुन्हेगारास पुणे येथे अटक !

गुन्हेगारांना कडक शिक्षा न झाल्याचा परिणाम ते सराईत गुन्हेगार बनतात, हे दर्शवणारी घटना ! गुन्हेगारांना कडक शिक्षाच हवी !

स्थानिक गुन्हे शाखा आणि नारायणगाव पोलिसांनी गांजाची तस्करी करणार्‍याला अटक केली

नारायणगाव (पुणे), १९ ऑगस्ट – स्थानिक गुन्हे शाखा आणि नारायणगाव पोलिसांनी गांजाची तस्करी करणार्‍या गाडीचा पाठलाग करून ३ गुन्हे नोंद असलेल्या सराईत गुन्हेगार दीपक तामचिकर याला १६ ऑगस्ट या दिवशी अटक केली आहे. आरोपीकडून ६ किलो ९१५ ग्रॅम गांजा आणि चारचाकी गाडी, असा १० लाख १५ सहस्र ७७५ रुपये मूल्याचा मुद्देमाल जप्त केला. जुन्नर न्यायालयाने आरोपीला ३ दिवसांची पोलीस कोठडी दिली आहे, अशी माहिती नारायणगाव पोलीस ठाण्याचे साहाय्यक पोलीस निरीक्षक पृथ्वीराज ताटे यांनी दिली.