भारताला शौर्यशाली इतिहास लाभला असतांनाही आपण काबुलमध्ये सैन्य पाठवण्यास नकार दिला ! – डॉ. सुब्रह्मण्यम् स्वामी

डॉ. सुब्रह्मण्यम् स्वामी

नवी देहली – अफगाणिस्तानची सीमा भारताला (पाकव्याप्त काश्मीरला) लागून आहे. अफगाणिस्तानवर भारताने राज्य केले आहे. महाभारताच्या काळापासून ते अलीकडे महाराजा रणजित सिंह यांच्यापर्यंत आपण अफगाणिस्तानवर राज्य केल्याचा इतिहास आहे. भारताचा असा शौर्यशाली इतिहास असतांनाही ‘आपण लडाखमध्ये चीन ‘आक्रमक’ होता’, असे सांगण्यास थरथरतो, तसेच काबुलला सैन्य पाठवण्यास नकार देतो, अशी टीका भाजपचे नेते आणि खासदार डॉ. सुब्रह्मण्यम् स्वामी यांनी ट्वीट करून केली आहे.