मुसलमानांनी मुसलमानांची हत्या केल्यावर बहुतांश मुसलमान गप्प बसतात; मात्र अन्य धर्मियांनी मारल्यावर ते चिडतात ! – बांगलादेशी लेखिका तस्लिमा नसरीन

याविषयी भारतातील कथित निधर्मीवादी आणि बुद्धीवादी यांना काय म्हणायचे आहे ? – संपादक

बांगलादेशी लेखिका तस्लिमा नसरीन

नवी देहली – जेव्हा मुसलमान मुसलमानांची हत्या करतात, तेव्हा बहुतेक मुसलमान गप्प असतात. जेव्हा मुसलमानेतर मुसलमानांना मारतात, तेव्हा बहुतेक मुसलमान चिडतात. अफगाणी मुसलमानांसाठी मुसलमान रडणार नाहीत, ते पॅलेस्टिनी मुसलमानांसाठी रडतील, अशी टीका बांगलादेशी लेखिका तस्लिमा नसरीन यांनी ट्वीट करून मुसलमानांच्या मानसिकतेवर केली आहे.

इस्लाम हा स्त्रीजातीचा द्वेष करणारा धर्म  !

दुसर्‍या एका ट्वीटमध्ये तस्लिमा नसरीन यांनी म्हटले की, तालिबान महिलांच्या मुळावर उठला आहे. त्यांच्या राज्यात महिला कुठेही दिसणार नाहीत. महिलांना लैंगिक गुलाम आणि मूल जन्माला घालणारे यंत्र (मशीन) म्हणून घरीच ठेवले जाईल. इस्लाम हा स्त्रीजातीचा द्वेष करणारा धर्म आहे.

७ व्या शतकातील धर्मांधांप्रमाणे भूमी बळकावणारे तालिबानी !

७ व्या शतकात धर्मांधांनी भूमी बळकावली होती. त्याप्रमाणेच २१ व्या शतकात  तालिबान अशा पद्धतीने भूमीवर नियंत्रण मिळवत आहे. तालिबानमुळे आधुनिक काळात ‘मध्ययुग’ (युरोपमध्ये रोमन साम्राज्य कोसळल्यानंतर धर्मांध उस्मानचे साम्राज्य चालू झाले. त्याला मध्ययुग म्हणतात.) अवतरणार आहे’, असे ट्वीटही तस्लिमा नसरीन यांनी केली आहे. यावरून धर्मांधांकडून त्याला विरोध केला जात आहे.