२८.६.२०२१ या दिवशी हिंदु जनजागृती समितीचे महाराष्ट्र आणि छत्तीसगड राज्य संघटक श्री. सुनील घनवट यांचा वाढदिवस झाला. त्या निमित्त साधिकेला सुचलेली कविता पुढे दिली आहे.
प्रतिभा तुमची जागृत झाली । कविता वाचून भावजागृती झाली ।। १ ।।
गुरूंनी निवडला हिरा लाखांतून । घडवत आहेत पैलू पाडून ।। २ ।।
कार्य आणि साधनेचा मेळ साधूनी । ललकारी घुमते गगनातूनी ।। ३ ।।
आली पहाट हिंदु राष्ट्राची । सुनीलदादांवर (टीप) गुरुकृपेच्या वर्षावाची ।। ४ ।।
टीप – श्री. सुनील घनवट यांच्यावर
– कु. कुशावर्ता माळी, चाळीसगाव, जिल्हा जळगाव. (२८.६.२०२१)
श्री. सुनील घनवट यांच्या नावाचा देवाने सुचवलेला अर्थ
सु – सुनिश्चयी
नी – नियोजनकौशल्य असलेले
ल – लक्ष्यप्राप्तीसाठी तळमळणारे
घ – घनगर्जित वक्तृत्व असणारे
न – नम्रतेने बोलणारे
व – वटवृक्षाप्रमाणे धर्मप्रेमींना आधार देणारे
ट – टवटवीत कमलपुष्पाप्रमाणे प्रसन्न असणारे
‘श्रीकृष्ण, सनातन परिवार आणि धर्मप्रेमी यांच्या लाडक्या सुनीलदादांची जलद आध्यात्मिक उन्नती होवो’, ही श्री गुरुचरणी प्रार्थना !’
– कु. कुशावर्ता माळी, चाळीसगाव, जिल्हा जळगाव. (२८.६.२०२१)