पणजी, १२ ऑगस्ट (वार्ता.) – गोव्यात नळाद्वारे पुरवले जाणारे पाणी पिण्यायोग्य आणि सुरक्षित आहे, असा खुलासा सार्वजनिक बांधकाम खात्याने केला आहे. येथील समुद्र विज्ञान केंद्रात (नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ओशनोग्राफी) महत्त्वाच्या शहरांतील पिण्याच्या पाण्याची तपासणी करण्यात आली होती. देहली येथील ‘टॉक्सिक्सलीक’ या संस्थेने राज्यातील पिण्याच्या पाण्याची तपासणी केली असता नळाद्वारे पुरवठा केल्या जाणार्या पाण्यात प्लास्टिकचे अंश सापडले असून ते मानवी आरोग्याला अपायकारक आहेत, असे त्यांनी म्हटले होते. यावर सार्वजनिक बांधकाम खात्याने हा खुलासा दिला आहे. खात्याच्या या खुलाशानंतर समुद्र विज्ञान केंद्राचे मुख्य संशोधक डॉ. साहा यांनीही म्हटले आहे की, लोकांनी या अहवालामुळे घाबरून जाऊ नये.