घुसखोर रोहिंग्या देशासाठी धोकादायक ! – केंद्र सरकार

रोहिंग्या, बांगलादेशी आदी घुसखोर देशासाठी धोकादायक आहेत, हे स्पष्ट आहे; मात्र सरकारने त्यांना लवकरात लवकर शोधून देशातून हाकलले पाहिजे, असे राष्ट्रप्रेमींना वाटते !

नवी देहली – भारतात घुसखोरी करून रहात असलेले रोहिंग्या देशाच्या सुरक्षेसाठी  धोकादायक आहेत. हे घुसखोर रोहिंग्या देशामध्ये प्रतिदिन कोणत्या ना कोणत्या गुन्हेगारी कृत्यामध्ये सहभागी झाल्याची माहिती येत आहे. त्यांची ओळख पटवण्यासाठी राज्यांना निर्देश देण्यात आले असून त्याविषयीचे काम चालू आहे, अशी माहिती केंद्रीय गृहराज्यमंत्री नित्यानंद राय यांनी लोकसभेत दिली.

केंद्रीय गृहराज्यमंत्री नित्यानंद राय

संपूर्ण देशात राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणी (एन्.आर्.सी.) लागू करण्याविषयी अद्याप कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही. सरकारने वर्ष २०२१च्या जनगणनेच्या पहिल्या टप्प्यामध्ये राष्ट्रीय लोकसंख्या नोंदणी (एन्.पी.आर्.) अद्ययावत करण्याचा निर्णय घेतला आहे.