सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे यांच्या जन्मदिनांकावरून सुचलेले काव्य !

‘प.पू. गुरुमाऊलींचे आणि देवीस्वरूप असणार्‍या दोन्ही मातांचे (श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांचे) आध्यात्मिक पुत्र असणार्‍या सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळेकाका यांच्या चरणी शिरसाष्टांग नमस्कार !

आधुनिक वैद्या (डॉ.) सौ. मधुवंती पिंगळे
सौ. वैदेही गुरुप्रसाद गौडा

सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळेकाका यांचा जन्मदिनांक ६.८.१९६७ आहे. त्यावरून सुचलेले काव्य पुढे दिले आहे.

६ – षड्रिपूंवर मात करणारे ।

८ – अष्टांग साधना करणारे, अष्टावधानी झालेले ।

१ – अद्वैताकडे (‘ईश्वर आणि मी एक आहे’, या भावाकडे) प्रवास करणारे ।

९ – नवविधा भक्ती समष्टीला शिकवणारे ।

६ + ७ = १३ – ‘सब कुछ तेरा कुछ नही मेरा ।’, म्हणजे सर्वस्व गुरूंना अर्पणारे ।

असे आमचे सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळेकाका ।’

असे आमुचे सद्गुरु काका आहात तुम्ही ।

सहजता आणि नम्रभाव असे ज्यांच्या ठायी ।
शिष्यभाव असतो सतत अंतर्मनी ।। १ ।।

गुरुरूपची दिसे ज्यांना चराचरी ।
कर्म, ज्ञान आणि भक्ती यांच्या अपूर्व संगमातूनी ।
एकरूप ते झाले समष्टी गुरुतत्त्वाशी ।। २ ।।

जळी, स्थळी, काष्ठी, पाषाणी गुरूच पहाती ।
असे आमुचे सद्गुरु काका आहात तुम्ही ।। ३ ।।

– आधुनिक वैद्या (डॉ.) सौ. मधुवंती पिंगळे (पत्नी) आणि सौ. वैदेही गौडा (मुलगी, आध्यात्मिक पातळी ६२ टक्के), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (९.८.२०२१)

येथे प्रसिद्ध  करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक