फरिदाबाद येथील साधिका श्रीमती मंजू धीमान यांना सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळेकाका यांच्या संदर्भात आलेली वैशिष्ट्यपूर्ण अनुभूती

सद्गुरु (डॉ.) चारुदत्त पिंगळे

१. पहाटे साधिकेच्या स्वप्नात सद्गुरु पिंगळेकाका आल्याचे दिसून त्यांनी साधिकेला मनगटात बांधण्याचा एक अलंकार (माळ) देणे

‘१९.२.२०२० या दिवशी पहाटे मला स्वप्नात सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळेकाका दिसले. त्यांच्यासमवेत कु. पूनम किंगर ही साधिका होती. सद्गुरु काकांच्या जवळ सुंदर खडे जडवलेला दागिन्यांचा एक ‘सेट’ होता. त्यातील खडे जडवलेला मनगटात बांधण्याचा एक अलंकार (माळ) स्वप्नात सद्गुरु काकांनी मला दिला आणि पूनम किंगर या साधिकेला मोत्यांची मोठी माळ दिली. तेव्हा माझ्या मनात विचार आला, सद्गुरु काकांनी पूनम किंगरला मोत्यांची मोठी माळ दिली आणि मला मनगटावर बांधायची छोटी माळ दिली. नंतर मी सद्गुरु काकांना कुंकुमतिलक लावला. नंतर माझ्या मनात आले की, काही दिवसांपूर्वी जेव्हा सद्गुरु काका प्रत्यक्षात आमच्या घरी आले होते, तेव्हा मी त्यांना तिलक लावला नव्हता. त्यामुळे स्वप्नात ईश्वराने माझ्याकडून त्यांना कुंकुमतिलक लावून घेतला.

२. साधिकेने सद्गुरु पिंगळेकाकांना स्वप्नाविषयी सांगितल्यावर त्यांनी सांगितलेला भावार्थ ऐकून भाव जागृत होणे

नंतर मी सद्गुरु काकांना ही अनुभूती सांगितली. तेव्हा ते म्हणाले, ‘‘ही परात्पर गुरु डॉक्टरांची कृपा आहे. तेच माझे रूप घेऊन तुमच्या स्वप्नात आले होते. ‘मनगटावर माळ बांधणे’, म्हणजे परात्पर गुरुदेवांनी ‘शिष्य-साधक’ म्हणून तुमचा स्वीकार करून तुमच्यावर कृपा केली आहे.’’

हे ऐकून माझ्या अंगावर रोमांच आले आणि माझा भाव जागृत होऊन माझ्याकडून कृतज्ञता व्यक्त झाली. परात्पर गुरु डॉक्टरांच्या चरणी कोटीशः कृतज्ञता !’

– श्रीमती मंजू धीमान, सैनिक कॉलनी, फरिदाबाद. (२५.२.२०२०)

येथे प्रसिद्ध  करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक