भारत स्वतंत्र होऊन ७४ वर्षे झाली; मात्र अजूनही कित्येक सामान्य नागरिकांना मूलभूत सुविधांपासून वंचित रहावे लागत आहे. देशाला स्वातंत्र्य मिळाले; मात्र धर्मनिरपेक्षतेच्या नावाखाली सर्वपक्षीय राज्यकर्ते अल्पसंख्यांकांचे लांगूलचालन करत बहुसंख्य हिंदूंवर अन्याय करत आहेत. त्यामुळे भारतात सुराज्य स्थापन होऊन येथील हिंदूंना स्वाभिमानाने जगता यावे यासाठी स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर हिंदु जनजागृती समितीच्या वतीने ११ ऑगस्ट या दिवशी ‘चर्चा हिन्दू राष्ट्र की…’ या विशेष ‘ऑनलाईन’ परिसंवादाचे आयोजन करण्यात आले आहे.
वार, दिनांक आणि वेळ : बुधवार, ११ ऑगस्ट २०२१, रात्री ७ वाजता
प्रमुख वक्ते
१. प्राध्यापक (सौ.) गौरी कुलकर्णी, प्रतिनिधी, ‘सनातन प्रभात’ नियतकालिक
२. अधिवक्ता नीलेश सांगोलकर, समन्वयक, सुराज्य अभियान
३. श्री. नरेंद्र सुर्वे, प्रवक्ता, हिंदु जनजागृती समिती