कठुआ (जम्मू-काश्मीर) येथील धरणामध्ये भारतीय सैन्याचे ‘ध्रुव’ हेलिकॉप्टर कोसळले

दोन्ही वैमानिक बेपत्ता

जगामध्ये केवळ भारताचीच वायूदल, भूदल आणि नौदल यांची विमाने किंवा हेलिकॉप्टर संपतकाळात कोसळतात, हे भारताला लज्जास्पद ! – संपादक

श्रीनगर (जम्मू-काश्मीर) – भारतीय सैन्याचे भारतीय बनावटीचे ‘ध्रुव’ हेलिकॉप्टर सकाळी कठुआ जिल्ह्यातील रणजीत सागर धरणामध्ये कोसळले. यात २ वैमानिक होते. प्रशिक्षणासाठी या हेलिकॉप्टरने उड्डाण केले होते. धरणाच्या वरून घिरट्या घालत असतांना ते खाली कोसळले. घटनेची माहिती मिळताच एन्.डी.आर्.एफ्.च्या पथकाने घटनास्थळी पोचून साहाय्यता कार्य चालू केले आहे. तसेच शोधकार्यासाठी पाणबुड्यांचेही साहाय्य घेतले जात आहे. हा अपघात नेमका कसा झाला, याविषयी माहिती अद्याप समोर आलेली नाही.