गडहिंग्लज (जिल्हा कोल्हापूर) येथील कु. संजना कुराडे हिला १० वीच्या परीक्षेत ९८ टक्के गुण !

कु. संजना कुराडे

गडहिंग्लज (जिल्हा कोल्हापूर) – येथील सनातनची साधिका कु. संजना कुराडे हिला १० वीच्या परीक्षेत ९८ टक्के गुण मिळाले आहेत. कु. संजना स्वरक्षण प्रशिक्षण, तसेच सोशल मीडियाच्या माध्यमातून सेवा करते. आपल्या यशाविषयी कु. संजना म्हणाली, कोरोनाच्या काळामध्ये निर्माण झालेली परिस्थिती गुरुकृपेने स्थिर राहून स्वीकारता आली. अभ्यास करण्यापूर्वी प्रार्थना, गुरुस्मरण-गुरुपादुकांचे स्मरण करत असे. त्याचा लाभ झाला. श्रीगुरुकृपेने अभ्यास आणि सेवा यांची सांगड घालून ताण न घेता अभ्यास करू शकले. या यशाविषयी श्रीगुरूंच्या चरणी कृतज्ञता व्यक्त करते.

मिरज येथील कु. राजीश्‍वर शेट्टी याला ८१ टक्के गुण !

मिरज (जिल्हा सांगली) – येथील सनातनचा साधक कु. राजीश्‍वर विनयकुमार शेट्टी याला इयत्ता १० वीच्या परीक्षेत ८१ टक्के गुण मिळाले आहेत. कु. राजीश्‍वर हा सेंट अल्फोन्सा शाळेचा विद्यार्थी आहे. कु. राजीश्‍वर हा प्रासंगिक सेवेसमवेत दैनिक सनातन प्रभातच्या वितरणाची सेवा करतो. कु. राजीश्‍वर हा नियमितपणे श्री गुरुदेव दत्त हा जप, श्री सूक्त आणि हनुमान चालीसा यांचे पठण करतो. तो मिरज येथील पू. संतोष दाभाडे माऊली यांच्याकडे सेवेसाठी नियमित जातो, तसेच त्यांनी सांगितलेला नामजपही करतो. हे यश मला परात्पर गुरु (डॉ.) जयंत आठवले आणि पू. संतोष दाभाडे माऊली यांच्यामुळे मिळाले, असे कु. राजीश्‍वर याने सांगितले.