कोल्हापूर – प्रतिवर्षी आषाढीच्या निमित्ताने भक्त मंडळ आणि जय शिवराय फूटबॉल प्लेअर तरुण मंडळ’ यांच्या वतीने होणारा ‘श्री ज्ञानेश्वर माऊली पालखी सोहळा’ हा २० जुलैला विठ्ठल मंदिर, मिरजकर तिकटी येथून सकाळी ८ वाजता प्रस्थान करणार आहे. प्रारंभी श्री. ऋतुराज क्षीरसागर यांच्या हस्ते आरती होईल, तसेच विश्व हिंदु परिषदेचे अधिवक्ता रणजितसिंह घाटगे यांच्या हस्ते माऊली अश्व पूजन होईल.
सौजन्य : S News Kolhapur
कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर नगर प्रदक्षिणा आणि रात्रीचे प्रवचन-कीर्तन हे सोहळे सरकारी नियमानुसार रहित करण्यात आले आहेत. अन्य सर्व कार्यक्रम हे कोरोना संसर्गाचे सर्व नियम पाळून होतील, अशी माहिती दिंडीप्रमुख ह.भ.प. आनंदराव लाड महाराज आणि ह.भ.प. बाळासाहेब पवार यांनी दिली आहे.