साधकांना विष्णुरूप दाखवून त्यांच्यावर कृपा करणारे परात्पर गुरु डॉ. आठवले !
गुरुरायांनी मज काय दिले, शब्दांत व्यक्त न झाले ।
हाक मारिता मनोभावे, साक्षात् विष्णुरूप दाखवले ।। १ ।।
बघता ते शेषनाग देवतेचे विराट रूप, नीलवर्णी श्रीमन्नारायण ।
त्या तेजाने भान माझे हरपले ।। २ ।।
भोवळ येऊनी चरणी मस्तक ठेवले ।
दिव्य ते मत्स्यरूप दाखवले ।। ३ ।।
विशालकाय समुद्रलाटा पाहूनी, रोम रोम शहारले ।
संपूर्ण शरण येऊनी गुरुचरणी, भावपुष्प अर्पिले ।। ४ ।।
– सौ. संध्या जावळे, बार्शी, जिल्हा सोलापूर. (२८.१०.२०२०)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |