कोपर्डी येथील शाळकरी मुलीवरील बलात्कार आणि हत्येच्या घटनेला ५ वर्षे पूर्ण !

आरोपींना लवकर शिक्षा देण्याची पालक आणि ग्रामस्थ यांची मागणी !

नगर  – कर्जत तालुक्यातील कोपर्डी येथील शाळकरी मुलीवर बलात्कार करून तिचा खून केल्याच्या घटनेला ५ वर्ष पूर्ण झाली. यासंबंधीचा खटला उच्च न्यायालयात प्रलंबित असून तो लवकरात लवकर चालवून आरोपींना शिक्षा करावी, अशी मागणी मुलीचे पालक आणि ग्रामस्थ यांनी केली आहे. नगरच्या जिल्हा आणि सत्र न्यायालयाने आरोपींना फाशीची शिक्षा सुनावली आहे; मात्र हा खटला मुंबई उच्च न्यायालयात गेला असून तो अद्याप प्रलंबित आहे. मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणात लक्ष घालून न्याय मिळवून द्यावा. न्याय मिळण्यासाठी आणखी किती काळ प्रतीक्षा करावी लागणार ?, असा प्रश्न मुलीच्या आईने उपस्थित केला आहे.