नेपाळच्या सर्वोच्च न्यायालयाकडून शेर बहादूर देऊबा यांना पंतप्रधान बनवण्याचा आदेश

  • काळजीवाहू पंतप्रधान के.पी. शर्मा ओली यांना झटका

  • संसद विसर्जित करण्याचा निर्णय रहित

शेर बहादूर देऊबा

काठमांडू (नेपाळ) – नेपाळच्या सर्वोच्च न्यायालयाने काळजीवाहू पंतप्रधान के.पी. शर्मा ओली यांना ‘विरोधी पक्ष असलेल्या नेपाळी काँग्रेसचे अध्यक्ष शेर बहादूर देऊबा यांना येत्या २ दिवसांत देशाचे पंतप्रधान करा’, असा आदेश दिला आहे. तसेच संसद विसर्जित करण्याचा आदेशही रहित केला आहे. यापूर्वी विरोधी पक्षाला बहुमत न मिळाल्याने राष्ट्रपती विद्यादेवी भंडारी यांनी ओली यांना पुन्हा काळजीवाहू पंतप्रधान बनवले होते. येत्या १८ जुलैला संसदेची बैठक बोलावण्यासही न्यायालयाने सांगितले आहे.