लक्ष्मणपुरी (उत्तरप्रदेश) येथील महिलेकडून पती अश्रफ महिलांचे धर्मांतर करत असल्याच्या तक्रारीवरून गुन्हा नोंद !

देशात केंद्र सरकारने धर्मांतरविरोधी कायदा लागू केल्यावरच याला आळा बसेल !

लक्ष्मणपुरी (उत्तरप्रदेश) – येथील इंदिरानगरमध्ये रहाणार्‍या महिलेने तिचा पती अश्रफ याच्याविरोधात पोलिसांत तो महिलांचे धर्मांतर करत असल्याचा गुन्हा नोंदवला आहे. पोलीस या प्रकरणाची चौकशी करत आहेत. अश्रफ बेंगळुरू येथील ‘खानखा-ए-अशरफिया हुसैनिया’ या दर्ग्यामध्ये काम करतो.

१. वर्ष २०१९ मध्ये या महिलेचा त्याच्याशी विवाह झाल्यानंतर तिला अश्रफ याच्या कृत्याची माहिती मिळाली. तिने त्याला समजावण्याचा प्रयत्न केला असता त्याने तिला मारहाण करण्यास चालू केले.

२. या महिलेने म्हटले आहे की, अश्रफ या दर्ग्यातून धर्मांतराचे काम करत आहे. भोळ्याभाबड्या महिलांना आमीष दाखवून त्यांचे धर्मांतर केले जात आहे. अश्रफ याने माहेरकडून २५ लाख रुपये आणण्यासाठी दबाव निर्माण केला. तसेच मारहाणही केली. सासूने गर्भलिंग परीक्षण करून मुलगी जन्माला येईल, हे लक्षात आल्यावर घरातून हाकलून लावले.