असंघटित क्षेत्रातील सुमारे ३० सहस्र कामगारांसाठी एकरकमी प्रत्येकी ५ सहस्र रुपयांचे अनुदान घोषित

पणजी – असंघटित क्षेत्रातील सुमारे ३० सहस्र कामगारांसाठी गोवा शासनाने प्रत्येकी ५ सहस्र रुपयांचे अनुदान घोषित केले आहे. हे कामगार कोरोना महामारीमुळे बेरोजगार आहेत. सामाजिक कल्याण योजनेखाली नोंदणी झालेले पारंपरिक व्यावसायिक,  रिक्शाचालक, पायलट (दुचाकी टॅक्सीचालक), चारचाकी टॅक्सीमालक, मनरेगा योजनेखालील कामगार आदी या योजनेचा लाभ घेऊ शकतात. हा लाभ मिळवण्यासाठी एक साधा अर्ज केल्यास पुरे आहे. सरकारही संबंधित संघटना, आस्थापने यांच्याकडून पात्र लाभार्थ्यांची सूची पडताळून पहाणार आहे. मंत्रीमंडळ बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.

वार्षिक उत्पन्न ८ लाखांहून अल्प असलेल्या कोरोनामुळे मृत्यू आलेल्यांच्या नातेवाईकांना २ लाख रुपये सानुग्रह अनुदान देण्यास मंत्रीमंडळाने मान्यता दिली आहे.