काबूल (अफगाणिस्तान) – गेल्या २४ घंट्यांमध्ये दक्षिण प्रांतातील हेलमंदमध्ये अफगाण सैन्याच्या कारवाईत ३०० हून अधिक तालिबानी आतंकवादी ठार झाले, अशी माहिती अफगाणिस्तानच्या संरक्षण मंत्रालयाने दिली आहे. अमेरिकेने १ जुलैपासून जवळपास सर्वच सैन्य माघारी घेण्यास प्रारंभ केला आहे. त्यानंतर तालिबान आणि अफगाण सैन्यांमध्ये संघर्ष चालू झाला आहे. तालिबानने दुर्गम, ग्रामीण भागांतील सरकारी इमारतींवर नियंत्रण मिळवले असून काही जिल्ह्यांवर पूर्ण नियंत्रण मिळवले आहे.
24 घंट में 300 आतंकी ढेर…अफगानिस्तान में तालिबानियों के लिए काल बनी सेनाhttps://t.co/MRm7U027dV
— Hindustan (@Live_Hindustan) July 4, 2021