भाजप महिला मोर्चाच्या वतीने शिवराज्याभिषेकदिन साजरा !

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करतांना सौ. स्वाती शिंदे (उजवीकडे), माजी आमदार श्री. नितीन शिंदे (डावीकडे), तसेच अन्य

सांगली, २५ जून (वार्ता.) – भाजप महिला मोर्चाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून शिवराज्याभिषेकदिन साजरा करण्यात आला. या वेळी भाजप महिला मोर्चा अध्यक्ष सौ. स्वाती शिंदे, माजी आमदार श्री. नितीन शिंदे, ज्योती कांबळे, माधुरी वसगडेकर, शैलजा कोळी, मनीषा शिंदे, विद्या दानोळे, लीना सावर्डेकर, संगीता जाधव, निकिता चव्हाण उपस्थित होत्या.

शिवराज्याभिषेकदिन म्हणजेच ‘हिंदु साम्राज्यदिन’ श्री संभाजी प्रतिष्ठानच्या वतीने साजरा !

सांगली – राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि ‘श्री संभाजी प्रतिष्ठान सांगली’ यांच्या संयुक्त विद्यमाने उत्तर शिवाजीनगर टिंबर एरियामध्ये तिथीनुसार शिवराज्याभिषेकदिन उत्साहात साजरा करण्यात आला. या वेळी ‘श्री संभाजी प्रतिष्ठान’चे श्री. नितीन शिंदे यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मूर्तीला पुष्पहार अर्पण करण्यात आला. प्रास्ताविक ‘श्री संभाजी प्रतिष्ठान’चे कार्यवाह श्री. प्रसाद रिसवडे यांनी केले. या वेळी संतोष पाटील, अंकुश ठोंबरे, अविनाश देवळेकर, डॉ. संदीप मोकाशी, अरुण माळी यांसह अन्य शिवप्रेमी उपस्थित होते.