आंतरराष्ट्रीय योगदिनाच्या निमित्ताने सांगली महापालिकेच्या पुढाकाराने ‘ऑनलाईन’ योग शिबिर !

योगदिनाच्या निमित्ताने योगासनांची माहिती देतांना पतंजली योग समितीचे सांगली जिल्हा प्रभारी श्री. शाम वैद्य (मध्यभागी) आणि योगासने करून दाखवतांना कार्यकर्ते

सांगली, २२ जून (वार्ता.) – आंतरराष्ट्रीय योगदिनाच्या निमित्ताने जिल्हा प्रशासन आणि सांगली महापालिका यांच्या वतीने ‘ऑनलाईन’ योग शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. सांगली, मिरज आणि कुपवाड महापालिकेचे महापौर दिग्विजय सूर्यवंशी यांच्या उपस्थितीत शिबिरास प्रारंभ झाला. यात पतंजली योग समितीचे सांगली जिल्हा प्रभारी श्री. शाम वैद्य यांनी उपस्थितांना माहिती दिली आणि त्याप्रमाणे योगासने करून घेतली. याचा लाभ ५०० हून अधिकजणांनी घेतला.

योगदिनाच्या निमित्ताने योगासनांची माहिती देतांना पतंजली योग समितीचे सांगली जिल्हा प्रभारी श्री. शाम वैद्य (मध्यभागी) आणि योगासने करून दाखवतांना कार्यकर्ते

या शिबिरात महिला बालकल्याण समिती सभापती गीतांजली ढोपे पाटील, ‘सिस्टीम मॅनेजर’ नकुल जकाते, पतंजली योग समितीच्या सौ. मंगल वैद्य, अमेय कुलकर्णी, श्रावणी देशपांडे, चैतन्य कलकूटगी यांसह अन्य सहभागी झाले होते.