….तर ऑनलाईन शिक्षणावर बहिष्कार घालू ! – अशोकराव थोरात, उपाध्यक्ष, महाराष्ट्र राज्य शिक्षण संस्था महामंडळ

ऑनलाईन शिक्षणावर बहिष्कार घालू – अशोकराव थोरात

सातारा, २२ जून (वार्ता.) – विनादाखला शालेय प्रवेशाविषयी शासनाचा निर्णय चुकीचा आहे. वेतनेतर अनुदान आणि शैक्षणिक शुल्क घेण्यास शासनाने आडकाठी केली, तर ऑनलाईन शिक्षणावर बहिष्कार घालू, अशी चेतावणी महाराष्ट्र राज्य शिक्षण संस्था महामंडळाचे उपाध्यक्ष अशोकराव थोरात यांनी दिली आहे.

अशोकराव थोरात पुढे म्हणाले, ‘‘सातारा येथे कोल्हापूर विभाग आणि सातारा जिल्हा शिक्षण संस्था यांची २५ जून या दिवशी बैठक घेण्यात येणार आहे. या वेळी दोन्ही विषयांवर चर्चा करून निर्णय घेतला जाईल. शिष्टमंडळाच्या वतीने शिक्षणमंत्री आणि अर्थमंत्री यांच्याशी चर्चा करण्यात येईल.’’