समाजातील संवेदनशीलता संपत चालल्याचे उदाहरण !
संभाजीनगर – शहरातील क्रांती चौक पेट्रोल पंपावरील कर्मचार्यांनी मृतदेह घेऊन जाणार्या एका रुग्णवाहिकेला इंधन देण्यास नकार दिला. त्यामुळे रुग्णवाहिकेत मृतदेह १ घंटा ताटकळत पडून होता. २ जून या दिवशी सकाळी ही घटना घडली.
रुग्णवाहिकेचा चालक इंधनासाठी १ घंटा कर्मचार्यांंकडे विनवणी करत होता. हा प्रकार समजल्यानंतर एका सामाजिक संघटनेने आक्रमक पवित्रा घेत ‘रस्ता बंद’ करण्याची चेतावणी दिली. त्यामुळे तेथे तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. पोलिसांनी पंपचालक आणि सामाजिक संघटना यांच्यात मध्यस्थी केल्यानंतर रुग्णवाहिकेला इंधन मिळाले.