मद्याची दुकाने सर्रास चालू ठेवल्याच्या निषेधार्थ मनसेचे नगरमध्ये आंदोलन

मनसेचे नगरमध्ये आंदोलन

नगर – मद्याच्या दुकानांतून पार्सल सेवा चालू असल्याच्या निषेधार्थ मनसेनेच्या कार्यकर्त्यांनी महाविकास आघाडीच्या प्रतिकात्मक पुतळ्यावर मद्य टाकून आंदोलन केले. तसेच हे सरकार मद्यप्रेमी असल्याचा आरोप केला. मनसेचे जिल्हा सचिव नितीन भुतारे, उपशहर अध्यक्ष गणेश शिंदे, संकेत व्यवहारे यांनी हे आंदोलन केले.

याविषयी नितीन भुतारे म्हणाल, ‘‘मद्याची दुकाने सर्रास चालू असून इतर सर्व व्यवहार बंद ठेवल्याच्या निषेधार्थ हे आंदोलन करण्यात आले. सरकारने सर्वसामान्यांचा विचार करून योग्य नियोजन करून बाजारपेठ लवकरात लवकर चालू करावी, अन्यथा मनसेच्या वतीने येणार्‍या काळात रास्तारोको आणि अन्य प्रकारचे तीव्र आंदोलन केले जाईल.’’