कोल्हापूर, १९ मे – दळणवळण बंदीच्या काळात दूध विक्री चालूच रहाणार आहे. पोलिसांनी घरपोच दूध विक्री करणार्यांना कधीही अडथळा आणलेला नाही. पोलिसांकडून १० नंतर दुकाने उघडून दूध विक्री करणार्यांवर कारवाई करण्यात आली आहे. तरी नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये. कुणाला काही अडचण असल्यास १०० क्रमांकावर दूरभाष करावा, असे आवाहन कोल्हापूरचे पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी केले आहे.
कुणीतरी खोडसाळपणे ‘उद्यापासून शहरात दूध विक्री बंद होणार’, असा संदेश सामाजिक माध्यमांवर पसरवला होता. त्या पार्श्वभूमीवर पोलीस अधीक्षकांनी हा खुलासा केला आहे. गोकुळची दूध विक्रीही नियमित चालू रहाणार आहे, असे गोकुळचे अध्यक्ष विश्वास पाटील यांनी सांगितले.