सोलापूरला औषधांचा पुरवठा सुरळीत न झाल्यास उच्च न्यायालयात जाणार

भाजप नेत्यांची महाविकास आघाडी सरकारला चेतावणी

सोलापूर – सोलापूर येथे ऑक्सिजनचा पुष्कळ तुटवडा आहे, तसेच रेमडेसिविर इंजेक्शनचाही मोठ्या प्रमाणात तुटवडा जाणवत आहे. पुढील दोन दिवसांत सोलापूरला ऑक्सिजन आणि रेमडेसिविर इंजेक्शनचा पुरवठा सुरळीत न झाल्यास सरकार विरोधात उच्च न्यायालयात दाद मागणार असल्याचे भाजपचे खासदार आणि आमदार यांनी सांगितले. या वेळी खासदार जयसिद्धेश्‍वर महास्वामी, माजी सहकारमंत्री सुभाष देशमुख, सोलापूरचे माजी पालकमंत्री विजयकुमार देशमुख, प्रशांत परिचारक, सचिन कल्याणशेट्टी, समाधान अवताडे यांसह अन्य आमदार उपस्थित होते.

जिल्ह्यातील भाजपचे ८ आमदार आणि २ खासदार यांनी सरकारच्या विरोधात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण केले. त्यानंतर जिल्हाधिकार्‍यांना निवेदन देण्यात आले. निवेदन दिल्यानंतर विभागीय आयुक्तांनी उपोषणकर्त्यांना आश्‍वासन दिल्यानंतर भाजप नेत्यांनी उपोषण मागे घेतले.