प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेअंतर्गत दिल्या जाणार्‍या विनामूल्य धान्य योजनेचा प्रारंभ

गरीबांना धान्य वाटप करतांना नगरसेविका (सौ.) स्वाती शिंदे (डावीकडे) आणि सौ. सुनंता राऊत

सांगली, ११ मे (वार्ता.) – कोरोना काळात अन्नसुरक्षा योजनेच्या अंतर्गत अंत्योदय आणि प्राधान्य कुटुंबातील लोकांना राज्यशासनाने प्रत्येक मास दिले जाणारे धान्य विनामूल्य देण्याची घोषणा केली आहे. याच समवेत प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेअंतर्गत कोरोनाच्या काळात या कुटुंबांना प्रत्येक घरातील व्यक्तीस ५ किलो धान्य हे मे आणि जून या २ मासांसाठी विनामूल्य दिले जाणार आहे. याचा प्रारंभ प्रभाग क्रमांक १६ च्या नगरसेविका सौ. स्वाती शिंदे आणि नगरसेविका सौ. सुनंता राऊत यांच्या प्रभागात करण्यात आला. या वेळी दोघींनी त्यांच्या प्रभागातील स्वस्त धान्य दुकानात हे धान्य योग्य प्रकारे दिले जात आहे ना ? याची पहाणी केली. प्रभाग क्रमांक १६ मध्ये साधारणत: २४ धान्य दुकाने आहेत. या वेळी श्रीधरपंत मेस्त्री, आशिष साळुंखे, शिमोन मोहिते उपस्थित होते.