१. मुख्य ‘कपिमुख’ असलेला आणि भगवान शिवाचा अकरावा अवतार असलेला हनुमंत !
‘हनुमानाच्या ११ मुखी स्वरूपाला हनुमंताचे ‘विराट स्वरूप’ असे म्हटले जाते. हा भगवान शंकराचा अकरावा अवतार आहे. हनुमानाचे मुख्य मुख ‘कपिमुख’ आहे. या नावाचे वर्णन गीतेमध्येही आले आहे. हनुमंताच्या ११ मुखांमध्ये त्याचे ‘कपिमुख’ मध्यभागी आहे. कपिमुखाच्या उजव्या बाजूला ५ मुखे आहेत आणि डाव्या बाजूला ५ मुखे आहेत. ‘कपिमुख’, म्हणजेच ‘वानरमुख’ मध्यभागी आहे; कारण ते त्याचे प्रमुख मुख आहे. हनुमंताच्या बहुतेक सर्व मंदिरांमध्ये हनुमानाच्या याच मुखाचे दर्शन होते.
२. हनुमंताच्या अकरा मुखांची नावे आणि त्यांचा क्रम
२ अ. कपिमुखाच्या उजव्या बाजूला असलेली ५ मुखे : वराहमुख, रुद्रमुख (शंकरमुख), हयग्रीवमुख, नागमुख (शेषनाग) आणि सौम्यमानवमुख
२ आ. कपिमुखाच्या डाव्या बाजूच्या असलेली ५ मुखे : ब्रह्मामुख, नरसिंहमुख, गजमुख, गरुडमुख आणि विष्णुमुख.’
(संदर्भ : अज्ञात)