रुग्णवाहिकेमधून देशी दारूची वाहतूक करणारे कह्यात !

  • रुग्णवाहिकेचा अवैध दारूसाठी वापर होणे, यातून समाज किती प्रमाणात व्यसनाधीन झाला आहे, हे लक्षात येते !
  • व्यसनाधीनतेमुळेे रुग्णवाहिकेचा दारूसाठी राजरोसपणे वापर करणार्‍या असंवेदनशील समाजाला कायद्याचे भय उरले नाही, असेच म्हणावे लागेल.
  • आत्मबळ अल्प झाल्यामुळे व्यसनाधीन होणार्‍या समाजाला रोखण्यासाठी धर्मशिक्षणाचीच आवश्यकता आहे.
प्रतिकात्मक छायाचित्र

नगर – सरकारने संचारबंदीचे नियम अधिक कडक केल्याने पोलीस अनेक ठिकाणी नाकाबंदी करून वाहनांची तपासणी करत आहेत. संगमनेरमध्ये नाकाबंदीच्या ठिकाणी शहर पोलीस तेथे तपासणी करत होते. एक रुग्णवाहिका सायरन (भोंगा) वाजवत आली असता ‘रुग्ण नसतांनाही सायरन का वाजवतो ?’, अशी पोलिसांनी विचारणा केली. चालक गोंधळल्याने पोलिसांना शंका आली आणि त्यांनी अधिक तपासणी केली. त्या वेळी रुग्णवाहिकेतून देशी दारूची अवैध वाहतूक केली जात असल्याचे उघड झाले. या प्रकरणी चालक विजय फड आणि त्याचा साथीदार कैलास नागरे या दोघांना कह्यात घेतले आहे. या वेळी पोलिसांनी ५ खोकी देशी दारू आणि रुग्णवाहिका असा सवा दोन लाख रुपयांचा मुद्देमाल शासनाधीन केला.