गोरेगाव (मुंबई) येथे भोंदूबाबाकडून महिलेवर लैंगिक अत्याचार आणि धमकी !

प्रतिकात्मक छायाचित्र

मुंबई – गोरेगाव भागात एका ३७ वर्षीय महिलेला एका भोंदूबाबाने ‘पतीला आजारातून बरे करतो’, असे सांगून तिच्यावर लैंगिक अत्याचार केले. तिच्या अल्पवयीन मुलींचाही विनयभंग केला. या गोष्टीची वाच्यता न करण्यासाठी तिला ‘नवर्‍याला काळी जादू करून मारून टाकेन’, अशी धमकीही दिली. पोलिसांनी या भोंदूबाबाला अटक केली आहे.

राजाराम यादव या ४३ वर्षांच्या एका रिक्शाचालक भोंदूबाबाने प्रथम या महिलेचा विश्वास संपादन केला होता. त्यानंतर भोंदूबाबाच्या त्रासाला कंटाळून पीडित महिला गावाला निघून गेली होती. तिथे त्रास झाल्याने ती परत मुंबईत आली. परत त्या मांत्रिकाने बरे करण्याच्या नावाखाली तिच्यावर लैंगिक अत्याचार केले.