
पुणे – डेक्कन परिसरातील ६० वर्षीय ज्येष्ठ महिलेला ‘डिजिटल अरेस्ट’ (आभासी अटक) करत २ कोटी ५७ लाख ५५ सहस्र रुपयांना फसवले. ‘तुमच्या बँक (अधिकोष) खात्याचा वापर एका मोठ्या मनीलाँड्रिंग (बेकायदेशीर अथवा गुन्हेगारी कृत्यातील पैसे कायदेशीररित्या उपयोग करण्याची प्रक्रिया) प्रकरणात केला आहे, तुमच्या मुलाचे नाव आहे. तुमच्यावर अटक पत्र निघू शकते’, अशी बतावणी केली. हा प्रकार १५ फेब्रुवारीपासून महिनाभर चालू होता. १२ मार्च या दिवशी ज्येष्ठ महिलेने स्वत:च्या अमेरिकेमध्ये रहाणार्या मुलाला हा प्रकार सांगितला. त्यानंतर पोलीस तक्रार करण्यात आली.