
मुंबई – भारत वर्ष २०४७ मध्ये ‘विकसित भारत’ होण्याच्या दिशेने पुढे जात असतांना अर्थव्यवस्थेतील नव्या आव्हानांना सामोरे जाण्यासाठी नाविन्यपूर्ण आणि समावेशक वित्तीय प्रणाली आवश्यक आहे. रिझर्व्ह बँक भारताच्या आर्थिक स्थैर्याचा आधारस्तंभ रहाणार आहे. भारताला डिजिटल व्यवहारांमध्ये जागतिक नेतृत्व मिळवून देण्यात रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचा मोठा वाटा आहे. मजबूत बँकिंग प्रणाली, वित्तीय नवउपक्रम आणि ग्राहकांचा विश्वास कायम राखण्याच्या दृष्टीने याची भूमिका अत्यंत महत्त्वाची असेल, असे प्रतिपादन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी येथे केले.
एन्.सी.पी.ए. नरिमन पॉईंट येथे १ एप्रिल या दिवशी आयोजित रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या ९० व्या वर्धापन दिनानिमित्त कार्यक्रमात त्या बोलत होत्या. या वेळी व्यासपिठावर राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, रिझर्व्ह बँकेचे गर्व्हनर संजय मल्होत्रा उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक ‘आर्.बी.आय.’चे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी केले.