वादळी वारे, ढगांचा गडगडाट आणि अवेळी पाऊस यांची शक्यता
मुंबई – बंगालच्या उपसागरावरून येणारे बाष्पयुक्त वारे आणि ओडिशापासून तमिळनाडूपर्यंत हवेची द्रोणीय स्थिती निर्माण झाल्यामुळे पुढील ५ दिवस राज्यात ढगाळ वातावरण असणार आहे, अशी माहिती हवामान विभागाने दिली. वादळी वार्यासह ढगांचा गडगडाट आणि अवेळी पाऊस यांची शक्यता वर्तवण्यात आली आहे. पुढील २ दिवसांत ताशी ४० ते ६० किमी प्रतिघंटा वेगाने वारे वहातील. त्या काळात राज्यात कमाल तापमान ३५ ते ४२ अंश सेल्सिअस राहील, असेही विभागाने सांगितले.