‘जगाला जाळून टाकण्याची इच्छा करणार्या क्रूर मनास ‘अॅटम्बॉम्बचे’ महत्त्व वाटत असले, तरी दयाशील असणार्या साधूस दान, धर्म आणि परोपकार याचीच अधिक किंमत वाटत असते. क्षुधेने व्याकूळ झालेल्या भिकार्यास, त्याला मिळालेल्या एक घासभर अन्नाचे महत्त्व अॅटम्बॉम्बपेक्षा अधिक आहे; कारण त्याला अपेक्षित वस्तू प्राप्त झाली. त्यामुळे मनाचे समाधान झाल्यानेच अॅटम्बॉम्बपेक्षा त्या घासभर अन्नास अधिक महत्त्व आहे. याचे आश्चर्य वाटण्याचे कारण नाही. एकंदरीत कालमानाप्रमाणे व्यक्तीगत अपेक्षेच्या योग्यतेप्रमाणे त्या त्या पदार्थाची किंमत ठरते आणि त्याचे महत्त्व वाढते.’
– प.प. भगवान श्रीधरस्वामी
(संदर्भ : मासिक ‘अमृतवाणी’, डिसेंबर १९९६)