‘जन्म झाल्यापासून कितीही खाल्ले असले, तरी ‘खायला हे पाहिजे, ते पाहिजे’ म्हणून कटकट करणारी जीभ कधी गप्प बसली आहे, असे नाही. हे झाले सज्जन गृहस्थाचे. ज्यांना स्त्रियांचे आणि उपाहारगृहातील चटकदार पदार्थांचे व्यसनच लागले आहे. त्यांना कुबेराची संपत्तीही अल्पच पडेल. एकंदरीत पैशाचा विनियोग प्रायः एक स्त्री आणि दुसरी जीभ, या दोघींचा हट्ट पूर्ण करण्याकडेच होत असल्यामुळे धनाचा अंतर्भाव या दोन विषयातच होतो. या दोन इंद्रियांचा काहीतरी विलक्षण प्रेमसंबंध आतून आहे. त्यामुळे विरक्ताने जीभ आवरावी.’
– प.प. भगवान श्रीधरस्वमी
(संदर्भ : मासिक ‘श्रीधर संदेश’, मे १९९८)