भारताने चीनच्या कर्ज देणार्‍या २७ अ‍ॅप्सवर घातली बंदी !

वास्तविक सरकारने एवढे होईपर्यंत वाट न पहाता चिनी अ‍ॅप्सवर तात्काळ बंदी घालणे अपेक्षित होते !

चिनी लोन अँपवर बंदी
चिनी लोन अँपवर बंदी

नवी देहली – भारत सरकारने चीनच्या आणखी काही अ‍ॅप्सवर बंदी घातली आहे. ऑनलाईन कर्ज देणार्‍या चीनच्या २७ अ‍ॅप्सवर या वेळी बंदी घालण्यात आली आहे. याची माहिती केंद्रीय अर्थराज्यमंत्री अनुराग ठाकूर यांनी लोकसभेत दिली. यापूर्वी भारताने चीनच्या अनेक अ‍ॅप्सवर बंदी घातली आहे. ऑनलाईन कर्ज देण्याच्या नावाखाली हे अ‍ॅप्स लोकांची फसवणूक करत असल्याच्या तक्रारी सरकारकडे आल्या होत्या. तसेच यामुळे १२ जणांनी आत्महत्याही केल्याचे समोर आले होते. यातूनच या अ‍ॅप्सवर बंदी घालण्यात आली.