विशाळगडावरील सर्व अतिक्रमणे तात्काळ हटवून सर्व दोषी अधिकार्‍यांवर कठोर कारवाई करा !

हिंदु जनजागृती समितीचे जिल्हा प्रशासनास निवेदन

अशी निवेदने का द्यावी लागतात ? प्रशासन स्वतःहून कारवाई का करत नाही ?

तहसीलदार शिवलिंग चव्हाण (उजवीकडे) यांना निवेदन देतांना हिंदुत्वनिष्ठ

सांगली, २६ मार्च (वार्ता.) – विशाळगडावरील सर्व अतिक्रमणे तात्काळ हटवून सर्व दोषी अधिकार्‍यांवर कठोर कारवाई करावी, गडावरील मंदिरे आणि योद्ध्यांची स्मारके यांचा जीर्णोद्धार करावा, पन्हाळा ते विशाळगड हा एकमेवाद्वितीय रणसंग्रामाचा गौरवशाली इतिहास समाजासमोर यावा, यासाठी पावनखिंड रणसंग्रामाचे बाजीप्रभु देशपांडे यांच्या समाधीस्थळ परिसरात ऐतिहासिक भव्य स्मारक येथे उभारण्यात यावे, या तसेच अन्य मागण्यांसाठी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने २५ मार्च या दिवशी जिल्हाधिकारी कार्यालयात तहसीलदार शिवलिंग चव्हाण यांना निवेदन देण्यात आले.

या वेळी बजरंग दलाचे मिरज तालुका संयोजक श्री. आकाश जाधव, श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे श्री. सचिन भोसले, युवासेनेचे श्री. अक्षय मिसाळ, हिंदु जनजागृती समितीचे श्री. किरण कुलकर्णी आणि श्री. गिरीश पुजारी उपस्थित होते.