
मुंबई, ७ एप्रिल – विरारमध्ये श्रीरामनवमीच्या निमित्ताने सकल हिंदु समाजाकडून काढण्यात आलेल्या शोभायात्रेवर बोळींज भागात एकता पार्क जवळ अंडी फेकण्यात आली.

त्यामुळे तणाव निर्माण झाला. या प्रकरणी बोळींज पोलिसांनी एका संशयिताला कह्यात घेतले आहे. येथील परिस्थिती नियंत्रणात असून पोलिसांनी शांतता राखण्याचे आवाहन केले आहे.
संपादकीय भूमिकाश्रीरामाच्या देशात श्रीरामनवमीच्या शोभायात्रेवर अंडी फेकली जातात, यातून कायदा-सुव्यवस्था अस्तित्वात नाही, हे लक्षात येते. पोलिसांनी संबंधितांचा कसून शोध घेऊन त्यांना शिक्षा करणे आवश्यक ! |