
मुंबई – गोवंडी परिसरात तब्बल ७२ मशिदी आणि मदरसे आहेत. या सर्वांवर असलेले भोंगे अनधिकृत आहेत, अशी माहिती गोवंडी पोलीस ठाण्याकडून देण्यात आली आहे. भाजपचे नेते आणि माजी खासदार डॉ. किरीट सोमय्या यांनी माहिती अधिकाराच्या अंतर्गत ही माहिती मागवली होती. या अनधिकृत भोंग्यांच्या विरोधात किरीट सोमय्या यांनी गोवंडी पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे.
गोवंडी पोलीस ठाण्याच्या अंतर्गत येणार्या देवनागर परिसरात किती मशिदींवर असलेल्या भोंग्यांवरून मोठ्या आवाजात अजान दिली जाते? तसेच किती मशिदींनी भोंगे लावण्याची अनुमती घेतलेली नाही ? ही माहिती डॉ. किरीट सोमय्या यांनी विचारली होती. यावर ‘भोंग्यांवरून मोठ्या आवाजात अजान दिल्याविषयी कोणतीही तक्रार प्राप्त झालेली नाही’, असे पोलीस ठाण्याकडून सांगण्यात आले आहे. पोलीस ठाण्याकडून देण्यात आलेल्या माहितीमध्ये गोवंडी परिसरात अनधिकृतरित्या भोंगे असलेल्या मशिदी आणि मदरसे यांची नावे माहितीसह दिली आहेत. १ जानेवारी २०२४ ते १७ फेब्रुवारी २०२५ या कालावधीतील ही माहिती आहे.
किरीट सोमय्या यांना धर्मांधाची धमकी !
या प्रकरणी किरीट सोमय्या यांना युसूफ अंसारी नावाच्या धर्मांधाने दूरभाषवरून धमकी दिली आहे. स्वत: किरीट सोमय्या यांनी याविषयी पत्रकारांना माहिती दिली आहे.
किरीट सोमय्या म्हणाले, ‘‘युसूफ अंसारी हे ‘हजरत ख्वाजा गरीब नवाज महाराष्ट्र कमिटी’चे सदस्य आहेत. धमकी देऊन धार्मिक तेढ निर्माण केल्याच्या प्रकरणी पोलिसांनी त्यांच्यावर गुन्हा नोंदवावा, अन्यथा या विरोधात मी आंदोलन करीन. अनधिकृत भोंगे लावणे, हे मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयाच्या विरोधात आहे. ज्या प्रकारे अवैध मशिदींचे बांधकाम करून भूमी बळकावण्याचे प्रकार चालू आहेत, ते येथे चालणार नाहीत.’’
संपादकीय भूमिकाअनधिकृत भोंग्यांची सूची देणारे; मात्र त्यांच्यावर कारवाई न करणारे पोलीस कायदा आणि सुव्यवस्था कशी राखणार ? |