सद्यःस्थितीत कोरोना महामारीनेे उद्भवलेल्या संकटामुळे महर्षींनी केलेल्या भविष्यवाणीचे स्मरण होणे

श्रीमती कमलिनी कुंडले

‘१४.११.२०२० या दिवशी मला अकस्मात् महर्षींनी केलेल्या भविष्यवाणीचे स्मरण झाले. त्यांची भविष्यवाणी दैनिक ‘सनातन प्रभात’मध्ये छापून आली होती.  त्यांनी सांगितले, ‘आंब्याच्या कोयीतही किडा होऊ शकतो. दुधामुळेही विषबाधा होऊ शकते. त्यामुळे प्रत्येक पदार्थ पडताळूनच खावा. शक्यतो बाहेरचे खाणे टाळावे. सर्वांत अधिक त्रास मीठ, तेल आणि मांसाहारजन्य पदार्थ इत्यादी पदार्थांपासून होईल. मांसाहारी पदार्थांमधून घरामध्ये विष येईल. त्यातून लोकांना ‘निदान होणार नाहीत’, असे रोग होतील.’

सध्या ‘कोरोना विषाणू’ हा चीनमधील मांस बाजारातून निर्माण झाल्याचे म्हटले जाते. जगभरातील त्याचा प्रभाव आपण अनुभवतच आहोत. वर्ष २०२१ पासून तिसर्‍या महायुद्धाला आरंभ होणार असल्याचेही ऐकिवात आहे. त्यामुळे आतापासूनच या घोर आपत्काळात रक्षण होण्यासाठी साधकांनी देवाला पुढीलप्रमाणे भावपूर्ण प्रार्थना करावी, ‘या घनघोर आपत्काळात आम्हा साधकांचे रक्षण होऊ दे.’ प्रार्थनेमुळे साधकांभोवती संरक्षक कवच निर्माण होईल. येणार्‍या काळात एकामागोमाग एक युद्धे होतील. ‘मध्ये विश्रांतीसाठी वेळच नसेल’, असा भीषण आपत्काळ असणार आहे. त्यासाठी महर्षींनी काही उपायही सांगितले होते. यासाठी महर्षींच्या चरणी आम्ही साधक कोटीशः कृतज्ञ आहोत.’

– श्रीमती कमलिनी कुंडले, सनातन आश्रम, देवद, पनवेल. (१४.११.२०२०)

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक