परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी वेळोवेळी साधकांना केलेले मार्गदर्शन

प्रत्येक जिवाची साधना व्हावी, यासाठी परात्पर गुरु डॉ. आठवले हे वेळोवेळी साधकांना साधनेविषयी मार्गदर्शन करतात. १३ मार्च या दिवशी ‘साधनेविषयी शंकांचे निरसन’ हा विषय पाहिला. आज त्यापुढील भाग पाहूया.   

भाग ६

भाग ५. वाचण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा : https://sanatanprabhat.org/marathi/458856.html


(परात्पर गुरु) डॉ. आठवले

३. स्वभावदोष निर्मूलन

३ अ. मनातील गोष्ट मनात ठेवल्यामुळे ताण वाढतो आणि साधना चांगली होत नाही !

सौ. राखी मोदी : माझी मुलगी मनात पुष्कळ गोष्टी साठवून ठेवते. काहीही प्रसंग झाला की, ती तो मनात ठेवते. तिच्याकडून मनमोकळेपणाने सांगणे पुष्कळ अल्प होते.

परात्पर गुरु डॉक्टर : जेवढे मनात ठेवू, तितका ताण वाढत जातो आणि साधना चांगली होत नाही. संपूर्ण मन रिकामे झाले, तर मनोलयच होतो. मनोलय झाला, तर आपण ईश्‍वराजवळ पोचतो. ईश्‍वराच्या जवळ पोचणे, म्हणजे आनंदाची अनुभूती येते. २४ घंटे आनंद ! यासाठी स्वभावदोष निर्मूलन ग्रंथात सांगितलेल्या अ ३ पद्धतीप्रमाणे प्रसंगाचा सराव करायचा. त्यासाठी तिला वाक्ये लिहून द्या. तुम्हाला सर्व ठाऊक आहे ना !

सौ. राखी मोदी : नाही. थोडा अभ्यास करावा लागेल.

परात्पर गुरु डॉक्टर : संपूर्ण परिच्छेद लिहा. कुणी तरी मला भेटायला आले आहे किंवा मी कुणाला भेटायला गेले आहे, तर मी त्यांच्याशी मोकळेपणाने बोलत आहे. नंतर मला आश्‍चर्य वाटले की, ‘एवढी वर्षे मी बोलत नव्हते, ते आज बोलू शकले आणि मला आनंद झाला.’ तुम्ही असे एक पान लिहून तिला द्या.’ नंतर काळजी करू नका. हे केले, तर ती लवकर या समस्येतून बाहेर येईल. केवळ २ – ४ वेळा वाचायचे. नंतर लक्षात राहील. नंतर डोळे बंद करून मनातल्या मनात त्याचा सराव करायचा. मनातील जो संस्कार आहे ना, ‘मी बोलू शकत नाही’, त्याऐवजी ‘कुणाशीही बोलले, तरी मला आनंद मिळतो’, हा नवीन संस्कार होईल. त्यानंतर ती बोलू लागेल. (सौ. मोदी यांच्या मुलीला उद्देशून) आई-वडील जे शिकवू शकले नाहीत, ते तू स्वतः शिकून घे !

३ आ. स्वयंसूचना म्हणजे जे करायचे आहेे आणि जे करायचे नाही, ते स्मरणात ठेवणे

कु. वेदिका मोदी : स्वयंसूचनेचा याचा अर्थ काय ?

परात्पर गुरु डॉक्टर : स्वयंसूचना म्हणजे, आपल्याला जे करायचे आहेे, ते स्मरणात ठेवणे आणि जे करायचे नाही, तेसुद्धा स्मरणात ठेवणे. मनाला स्वयंसूचना दिल्याने त्याला समजते की, ‘अरे, हे करायचे नाही आणि हेे करायचे आहे.’

३ इ. प्रतिमा जपण्याच्या वृत्तीमुळे मनमोकळेपणा नसतो !

कु. पूनम किंगर : आता राखीताईने (सौ. राखी मोदी यांनी) जो प्रसंग सांगितला, त्यावरून असे लक्षात आले की, माझ्याकडून पूर्वी मनमोकळेपणे बोलण्याचे प्रयत्न मुळीच होत नव्हते. आता चालू झाले आहेत, तर मनाला थोडे चांगले वाटत आहे.

परात्पर गुरु डॉक्टर (सौ. मोदी यांच्या मुलीला उद्देशून) : ऐकले ना ? मनमोकळेपणाने बोलल्यावर चांगले वाटते.

कु. पूनम किंगर : परंतु काही प्रसंग मनात रहातात, जे कुणाजवळही व्यक्त करू शकत नाही. ‘प्रतिमा जपणे’ या अहंच्या पैलूमुळे ते विचारूनही घेता येत नाहीत आणि ‘तो विचार योग्य आहे कि अयोग्य’, हेही लक्षात येत नाही.

परात्पर गुरु डॉक्टर : त्यासाठी स्वयंसूचना द्यायची की, मी दुसर्‍यांना विचारून घेईन. कधी कधी आपल्याला असे वाटते की, हे योग्य आहे; परंतु प्रत्यक्षात ते योग्य नसते. त्याविषयी कुणाला तरी विचारून घ्यायचे, जर त्यांनी सांगितले, ‘हे योग्य आहे’, तरच तसे करावे.

३ ई. घरात भाऊ ‘व्हिडिओ’ लावतो, त्याचा आवाज सहन होत नाही !

कु. पूनम किंगर : दुसरी गोष्ट म्हणजे माझा भाऊ भ्रमणध्वनीवर (मोबाईलवर) किंवा फेसबूकवर काही असे विषय बघतो, उदा. मारामारी किंवा भांडणे चालली आहेत. त्या वेळी पुष्कळदा माझा आध्यात्मिक त्रास वाढतो. तो आवाज मला सहन होत नाही. त्रासाची तीव्रता एवढी वाढते की, असे वाटते की, ‘घरातून कुठेतरी निघून जावे.’

परात्पर गुरु डॉक्टर : तो आवाज (व्हॉल्युम) मोठा ठेवतो का ?

कु. पूनम किंगर : नाही. थोडाही आवाज आला, खोलीत सर्वजण बसून काही तरी बघत असतात; पण मला ते मुळीच सहन होत नाही.

परात्पर गुरु डॉक्टर : त्यासाठीही स्वयंसूचना द्यायची, ‘जेव्हा मी हा आवाज ऐकीन, तेव्हा माझा नामजप चालू होईल.’ जगात कुठेही काहीही होऊ द्या. आपण अंतर्मुख झालो आणि आपला नामजप चालू असेल, तर त्याचा आपल्यावर परिणाम होत नाही.

(क्रमश:) 

भाग ७. वाचण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा – https://sanatanprabhat.org/marathi/459117.html