राजकीय दबाव असता, तर राज्यपालांनी त्यागपत्राला संमती दिली नसती !

जळगाव आणि लोणेरे विद्यापिठातील कुलगुरूंच्या त्यागपत्रावरून झालेल्या आरोपांवर उच्चशिक्षणमंत्री उदय सामंत यांचे स्पष्टीकरण

उच्चशिक्षणमंत्री उदय सामंत

मुंबई, ५ मार्च (वार्ता.) – जळगाव आणि लोणेरे विद्यापिठांतील कुलगुरूंनी पदाचे त्यागपत्र दिल्यानंतर मुंबई विद्यापिठातून त्यांच्याशी चर्चा करून त्यागपत्राचे कारण समजून घेतले. त्यागपत्र देण्यासाठी त्यांच्यावर राजकीय दबाव असता, तर राज्यपालांनी त्यागपत्राला संमती दिली नसती, असे वक्तव्य उच्चशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी ४ मार्च या दिवशी विधान परिषदेत केले.

कुलगुरूंनी राजकीय दबावामुळे पदाचे त्यागपत्र दिल्याची चर्चा असल्याचे सांगत आमदार कपिल पाटील यांनी सभागृहात प्रश्‍न उपस्थित केला होता. त्यावर उदय सामंत यांनी वरील स्पष्टीकरण दिले. जळगाव विद्यापिठाच्या कुलगुरूंनी त्यांच्या आरोग्याच्या समस्येमुळे आणि लोणेरे विद्यापिठाच्या कुलगुरूंनी घरगुती अडचणींमुळे पदाचे त्यागपत्र दिले, असे या वेळी सामंत यांनी म्हटले.