शहडोल (मध्यप्रदेश) येथे तरुणीवरील सामूहिक बलात्काराच्या प्रकरणात भाजपच्या पदाधिकार्‍याचा समावेश

पक्षाकडून पदाधिकार्‍याची हकालपट्टी !

अशांना तत्परतेने कठोर शिक्षा होत नसल्याने अशा घटना थांबण्याऐवजी वाढत आहेत. सरकारला हे कधी कळणार ?

शहडोल (मध्यप्रदेश) – येथे एका २० वर्षीय तरुणीवर सामूहिक बलात्कार करण्यात आल्याच्या प्रकरणात भाजपच्या पदाधिकार्‍याचे नाव समोर आले आहे. या प्रकरणी त्याला पदावरून काढण्यात आले आहे. तसेच प्राथमिक सदस्यत्व रहित करण्यात आले आहे.

अतिरिक्त पोलीस अधीक्षक मुकेश वैश्य यांनी दिलेल्या माहितीनुसार पीडित तरुणीचे चौघांनी अपहरण करून तिला जैतपूर पोलीस ठाण्याच्या क्षेत्रात असलेल्या गाडाघाट परिसरातील फार्म हाऊसमध्ये नेले. तेथे तिला बलपूर्वक मद्य पाजण्यात आले आणि १८ आणि १९ फेब्रुवारीला तिच्यावर बलात्कार केला. या घटनेनंतर आरोपींनी पीडितेला तिच्या घरासमोरच गंभीर अवस्थेत फेकून ते निघून गेले. पीडितेची प्रकृती गंभीर असून तिला उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात भरती करण्यात आले आहे. पोलीस आरोपींना शोध घेत आहेत.