१. प्रेमभाव
‘गोडसेकाकू सर्व साधकांना साहाय्य करतात. साधक घरी आल्यावर काकूंना आनंद वाटतो.
२. सकारात्मक
त्या साधकांना समजून घेतात. त्यांच्या मनात कुणाविषयी नकारात्मकता किंवा पूर्वग्रह नाही.
३. स्वीकारण्याची वृत्ती
काकांची (काकूंच्या यजमानांची) आजारपणामुळे काही वेळा चिडचिड झाल्यास काकू त्यांना आईच्या मायेने समजून घ्यायच्या. काकांचीही साधना आणि सेवा व्हावी, अशी काकूंची तळमळ होती.
४. सेवाभाव
अ. काकूंना तीव्र आध्यात्मिक त्रास आहे, तरी त्या सतत सेवारत असतात. त्यांना अकलूज येथून इंदापूर येथे सेवेला जाण्यासाठी साधारण १ ते दीड घंटा वेळ लागतो; पण त्यांची सिद्धता असते.
आ. त्यांच्या घरी काही वेळा सत्संग असतो. त्या धर्मरथावरील साधकांसाठी प्रेमाने महाप्रसादाचे नियोजन करतात. त्या पहाटे उठून साधकांसाठी चहा करून देतात.
इ. काकू बाहेरगावी जाणार असल्यास घराची किल्ली शेजारी देऊन जातात. त्यामुळे त्या नसतांनाही त्यांच्या घरी सत्संग घेता येतो आणि साधकांच्या निवासाचे नियोजन करता येते.
ई. त्यांच्याकडे एका भागातील साधकांचे दायित्व होते. तेव्हा त्या साधकांच्या सेवांचे नियोजन करायच्या. त्या आढावा आणि अहवाल परिपूर्णरित्या करायच्या.
५. श्रद्धा
अ. काका रूग्णालयात असतांना काकू एकट्याच होत्या. तेव्हा त्या गुरुदेवांप्रतीच्या श्रद्धेमुळे स्थिर राहून सर्व सेवा करू शकल्या.
आ. काकांचे निधन झाल्यावर काकूंची मुले नातेवाइकांना भ्रमणभाष करत होती. त्या वेळी काकू एकट्याच तिथे होत्या. काकूंनी काकांचे डोळे बंद केले. या प्रसंगी मुले रडत असतांना काकू मुलांना धीर देत होत्या.
६. भाव
अ. ‘स्वतःचे घर आश्रमच आहे’, असा काकूंचा भाव असतो.
आ. काकांचे निधन झाल्याचे कळल्यावर आम्ही काकूंना भ्रमणभाष केला. तेव्हा त्या स्थिर होत्या. काकू त्याही स्थितीत अनुसंधानात आणि भावाच्या स्थितीत होत्या. ‘मी साधना करत असल्याने स्थिर आहे. गुरुदेव माझी काळजी घेत आहेत’, असे त्या सांगत होत्या.’
– कु. दीपाली मतकर आणि सौ. उल्का जठार, सोलापूर (८.८.२०१९)
• येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |