लातूर जिल्ह्यात बसस्थानकातून चोरट्यांनी एस्.टी. बस पळवली

औराद शहाजानी (जिल्हा लातूर) – येथील बसस्थानकात ४ फेब्रुवारीच्या मध्यरात्री मुक्कामी असलेली बस चोराने पळवली. बसचे वाहक आणि चालक बसस्थानकात झोपले होते. बस चोरीला गेल्याचे लक्षात येताच चालकाने या घटनेची माहिती पोलिसांना दिली. गस्त घालणार्‍या पोलिसांनी तात्काळ शोध घेतला असता शेळगी येथे पोलिसांना ही बस सापडली. चोरट्याचा शोध चालू आहे.