सध्याच्या शाळांमध्ये बाराखडीमधील अक्षरे शिकवण्याची आणि ओळखण्याची एक निराळी गंमतीशीर पद्धत असल्याचे परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी सांगणे

परात्पर गुरु डॉ. आठवले
सौ. अरुणा तावडे

‘एकदा परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी ‘अणू’ आणि ‘रेणू’ या शब्दांचे अर्थ शब्दकोषात पहाण्यास सांगितले. मी ते शब्दकोषात पहातांना ‘अनू’ शब्दाचा अर्थ पहात होते. तेव्हा परात्पर गुरूंनी ‘अनू’ नसून ‘अणू’ असा शब्द पहाण्यास सांगितला. तेव्हा मी म्हटले, ‘‘हं. मोठा ‘ण’ असलेला अणू शब्द पहाते.’’ तेव्हा ते हसले आणि म्हणाले, ‘‘तुम्हाला शाळेत असे मोठा ‘ण’ आणि छोटा ‘न’ असे शिकवले आहे का ?’’ मी ‘हो’ म्हटले. जवळच आणखी एक साधिका होती. तिने सांगितले, ‘‘आम्हाला शाळेत ‘न’ शब्द नळाचा आणि ‘ण’ शब्द म्हणजे बाणाचा’, असे शिकवले आहे.’’ तेव्हा ते म्हणाले, ‘‘आमच्या वेळी शाळेत असे काही शिकवले नव्हते. बाराखडीतील अक्षरांचा उच्चारानुसार ‘न’ आणि ‘ण’ हे लक्षात येणे महत्त्वाचे आहे.’’

– सौ. अरुणा तावडे, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (८.७.२०२०)