सिंधुदुर्ग – सिंधुदुर्ग जिल्ह्यात २३ जानेवारीला हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आणि नेताजी सुभाषचंद्र बोस यांची जयंती विविध ठिकाणी साजरी करण्यात आली.
कनेडी येथे शिवसेनेच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन
कणकवली – तालुक्यातील कनेडी येथील समाधीपुरुष सभागृहात शिवसेनेच्या नाटळ आणि हरकुळ-बुद्रूक विभागाच्या वतीने हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांची जयंती साजरी करण्यात आली. या वेळी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी १०२ जणांनी रक्तदान केले. जिल्हा बँकेचे अध्यक्ष सतीश सावंत यांच्या हस्ते या शिबिराचे उद्घाटन करण्यात आले.
मालवण – सर्जेकोट ग्रामपंचायत कार्यालयात ज्येष्ठ ग्रामस्थ श्री. रघुनंदन खडपकर यांच्या हस्ते बाळासाहेब ठाकरे आणि नेताजी बोस यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करण्यात आला. या वेळी ग्रामपंचायत सदस्यांसह अन्य उपस्थित होते. देवली ग्रामपंचायतीमध्ये ठाकरे आणि बोस यांची जयंती साजरी करण्यात आली.
वैभववाडी – येथील महाराणा प्रतापसिंह शिक्षण संस्था संचालित आनंदीबाई रावराणे महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभाग आणि इतिहास विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने नेताजी सुभाषचंद्र बोस यांची जयंती साजरी करण्यात आली.
कुडाळ – येथील पंचायत समिती सभागृहात बाळासाहेब ठाकरे आणि नेताजी बोस यांची जयंती साजरी करण्यात आली. या वेळी शिवसेनेचे आमदार वैभव नाईक आणि जिल्हाप्रमुख संजय पडते यांनी दोन्ही लोकनेत्यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण केला.