राष्ट्र आणि धर्म यांच्या सद्य: स्थितीसंदर्भात समाजाचे योग्य दिशादर्शन करणारे विशेष सदर : १०.१.२०२१      

प्रस्तूत सदरातून राष्ट्र आणि धर्म यांच्यावर होत असलेल्या घटना स्वरूपांतील विविध आघात अन् त्यांवर नेमकी उपाययोजना नि दृष्टीकोन देण्यात येतात. यातून आमच्या वाचकांना राष्ट्र नि धर्म यांच्या अनुषंगाने आपली विचारधारा कशी असली पाहिजे, याचे दिशादर्शन करण्याचा आमचा प्रयत्न आहे. यातून राष्ट्र आणि धर्म यांचा अभिमान बाळगणारे कृतीशील वाचक घडावेत, एवढीच अपेक्षा !

नावात इंग्रजी शब्द ठेवून इंग्रजीची गुलामी करणारे राजकीय पक्ष आणि संघटना !

‘भारताला इंग्रजांच्या गुलामीपासून स्वातंत्र्य मिळाले, तरी अद्याप इंग्रजी भाषेपासून भारतीय स्वतंत्र झालेले नाहीत. अनेक त्यांच्या राजकीय पक्षांची आणि काही संघटनांची नावेही इंग्रजीत आहेत. इंडियन नॅशनल काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, तृणमूल काँग्रेस, कम्युनिस्ट पार्टी, नॅशनल कॉन्फरन्स, हुरियत कॉन्फरन्स, पीपल्स डेमॉक्रेटिक पार्टी, भारतीय जनता पार्टी, आम आदमी पार्टी, समाजवादी पार्टी, भारतीय रिपब्लिक पार्टी, पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया, सोशालिस्ट डेमोक्रेटिक पार्टी ऑफ इंडिया, वायएस्आर् काँग्रेस पार्टी आदी पक्ष आणि संघटना इंग्रजांची गुलामगिरी करत आहेत.’


सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती असतांना काटजू यांनी भ्रष्टाचार्‍यांवर कृती का केली नाही ?

‘पंजाब नॅशनल बँकेत सहस्रो कोटी रुपयांचा घोटाळा करून  पसार झालेला आरोपी नीरव मोदी याच्या बचावासाठी इंग्लंडमधील न्यायालयात साक्ष देतांना माजी न्यायमूर्ती मार्कंडेय काटजू यांनी आरोप केला होता की, ‘भारतातील ५० टक्के न्यायव्यवस्था भ्रष्टाचारी आहे आणि म्हणूनच पसार आरोपी नीरव मोदी यांना भारतात योग्य न्याय मिळणे शक्य नाही.’


धर्मच राष्ट्राचा खरा आधार, धर्म बाजूला सारला, तर जगायचे कशाच्या जिवावर ? धर्म म्हणजे समाजकल्याण, धर्म म्हणजे सामाजिक बांधिलकी, धर्म म्हणजे समाजनियंत्रण, धर्म म्हणजे एका विशाल परिवारात प्रेमाने रहाण्याची हमी, धर्म म्हणजे आत्मविकास, समाजविकास आणि राष्ट्राचा उत्कर्ष करण्याची अनुज्ञप्ती !


हे सरकारला आधीच कळत कसे नाही ?  

‘सीतामातेच्या शोधात असतांना प्रभु श्रीरामाने वाळूची शिवपिंडी सिद्ध केली. या शिवपिंडीला अभिषेक घालण्यासाठी बाण मारून जो जलस्रोेत निर्माण केला, तो म्हणजे मुंबईतील वाळकेश्‍वर येथील बाणगंगा तलाव. असे आध्यात्मिक महत्त्व असलेल्या बाणगंगा तलावाच्या जवळ नव्याने बांधण्यात येत असलेल्या इमारतीच्या खोदकामामुळे तलावातील जलस्रोेतातून गढूळ पाणी यायला लागले आहे. भविष्यात इमारतीचे बांधकाम झाल्यास या बाणगंगा तलावातील नैसर्गिक जलाचा स्रोत लुप्त होऊन तलाव मृत होण्याचा धोका ‘गौड सारस्वत ब्राह्मण टेंपल ट्रस्ट’च्या वतीने व्यक्त करण्यात आला आहे.’