५ जुलै२०२० या दिवशी गुरुपौर्णिमा होती. त्या निमित्ताने साधकांना ‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी साधनेसंबंधी केलेले अमूल्य मार्गदर्शन’ या विषयावर पूर्वी परात्पर गुरु डॉक्टरांची साधकांशी झालेल्या भेटींच्या वेळची ध्वनीचित्रफीत दाखवण्यात आली. त्या वेळी साधकांनी विचारलेले प्रश्न आणि त्यावर परात्पर गुरुदेवांनी केलेले मार्गदर्शन येथे देत आहोत.
२ जानेवारी या दिवशी मार्गदर्शनातील काही सूत्रे आपण पाहिली. आज त्यापुढील सूत्रे पाहूया.
भाग एक साठी येथे क्लिक करा : https://sanatanprabhat.org/marathi/436765.html
भाग २ साठी येथे क्लिक करा : https://sanatanprabhat.org/marathi/437184.html
(भाग ३)
८. साधना ही अंतर्मनाची असल्यामुळे जगाच्या पाठीवर कुठेही राहिलो, तरी साधना करू शकतो !
एक साधक : मी आता एक वर्षापासून घरातच राहून सेवा करत आहे.
परात्पर गुरु डॉ. आठवले : अमेरिकेमध्ये रहा, नाहीतर आणखी कुठेही रहा. आपली सेवा चालू असली म्हणजे पुरे ! पुढे गेलात.
साधक : ‘घरचे आणि रामनाथी आश्रमाचे वातावरण अन् आनंद यांमध्ये पुष्कळ अंतर आहे’, असे जाणवते.
परात्पर गुरु डॉ. आठवले : ते तर असणारच ! त्यासाठी बाह्य वातावरणावर अवलंबून रहाता कामा नये. आतमध्येच आनंदाची जी स्थिती आहे, तिचे आलंबन (म्हणजे त्यावर मन एकाग्र करणे) केले, तर कुठेही पाठवले, तरी साधना होते. तसा प्रयत्न करा. येथे आश्रमात पुष्कळ चैतन्य आहे. त्यामुळे साधना आणखी जोरात गतीने होते. घरात कशी होईल ? ते तर शेवटी मायेतील घर आहे ना ?
आतून आनंदात राहिलात, तर सेवा इत्यादी आश्रमासारखीच होईल. हे विदेशातील साधक (विदेशात राहून साधना करणारे) बघा. अमेरिका काय, अनेक देशांत रहातात ना ? तेसुद्धा संत होतात ना ? त्यांचे उदाहरण समोर ठेवले, तर लवकर पुढे जाल.
साधिका : मला प्रक्रियेचा (स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलनाच्या प्रक्रियेचा) आनंद जाणवत नाही.
परात्पर गुरु डॉ. आठवले : आनंद मिळत नाही ?
साधिका : माझ्याकडून प्रक्रिया चांगल्या प्रकारे होत नाही.
परात्पर गुरु डॉ. आठवले : का बरे ?
साधिका : ठाऊक नाही. आतून जाणीव होत नसते.
परात्पर गुरु डॉ. आठवले : मग तुमच्या मुलीशी बोलून घ्या. ती तुमची कन्या असल्याने तिला ‘तुमचे व्यक्तीमत्त्व कसे आहे ? स्वभाव कसा आहे ?’, हे सर्व ठाऊक आहे ना ? एकेक सूत्र ती तुम्हाला सांगेल.
परात्पर गुरु डॉ. आठवले (साधिकेच्या पतीला उद्देशून) : तुम्ही काही सांगत नाही का ?
पती : मी प्रयत्न करतो.
परात्पर गुरु डॉ. आठवले : छान; परंतु त्या ऐकत नसतील. ही तर घराघरातील पती-पत्नीमधील गोष्ट आहे.
पती : येथे रामनाथी आश्रमात आल्यावर थोडीशी स्फूर्ती (चार्जिंग) मिळते, म्हणजे विषयाचे आकलन होते, चैतन्य मिळते आणि नंतर प्रयत्न होतात.
परात्पर गुरु डॉ. आठवले : प्रक्रिया झाल्यानंतर तुम्ही कुठेही गेलात, म्हणजे देहलीला, कोलकात्याला गेलात, तर सर्वत्र एकसारखेच वाटते; कारण मनाची स्थिती आनंदी असते. आनंदात अमेरिकेला गेलात, तरी काय भेद आहे ? आपण आनंदात आहोत ना ! पुष्कळच छान !
(क्रमश: उद्याच्या अंकात)
भाग ४ पहाण्यासाठी येथे क्लिक करा : https://sanatanprabhat.org/marathi/437824.html