म्हापसा – म्हापसा शहरातील मुख्य रस्त्यांच्या बाजूला पदपथ बांधण्याविषयी उच्च न्यायालयाने म्हापसा नगरपालिका, सार्वजनिक बांधकाम खाते आणि इतर संबंधित यांना नोटीस दिली आहे. गोवा फाऊंडेशन या संस्थेने याविषयीची याचिका उच्च न्यायालयात सादर केली होती. येथील म्हापसा आल्तिनो सर्कल ते म्हापसा बसस्थानक यामधला रस्ता, तसेच इतर प्रमुख रस्त्यांच्या बाजूला पदपथ बांधावेत, अशी मागणी या याचिकेद्वारे करण्यात आली होती. यावर ‘म्हापसा शहरातील प्रमुख ५ रस्त्यांच्या बाजूला पदपथ बांधण्याविषयी म्हापसा नगरपालिका, सार्वजनिक बांधकामे खाते यांनी आराखडा सिद्ध करून त्याची कार्यवाही करावी’, असा आदेश उच्च न्यायालयाने दिला आहे. यासंबंधीचा आराखडा उच्च न्यायालयाला सादर करावा, असे त्या आदेशात म्हटले आहे. (पदपथ बांधण्याविषयीही आता प्रशासनाला न्यायालयाने सांगावे लागते का ? – संपादक)