गुरुकृपायोगाची निर्मिती करणारे परात्पर गुरु डॉ. आठवले !
‘साधकांच्या जीवनात ‘गुरुचरणा’चे अनन्यसाधारण महत्त्व असल्याचे परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी आम्हाला शिकवले. ‘गुरुचरण’ हे तत्त्व असून त्यानुसार ते आमच्याकडून व्यष्टी आणि समष्टी साधना करवून घेत आहेत.
‘गुरुचरण’ (टीप १) मनी धरावे ।
‘गुरुचरण’ मस्तकी ठेवावे ।
‘गुरुचरण’ हृदयी वसवावे ॥ १ ॥
‘गुरुचरण’ देई व्यष्टी साधनेस स्फूर्ती ।
‘गुरुचरण’ देई समष्टी सेवेस चैतन्यशक्ती ।
‘गुरुचरण’ देई ज्ञान, वैराग्य, भक्ती ॥ २ ॥
‘गुरुचरणा’विण जीवन व्यर्थ जाई ।
‘गुरुचरणी’ मिळतसे सर्वकाही ।
‘गुरुचरणी’ साधक शरणागत होऊनी राही ॥ ३ ॥
टीप १ – सनातनच्या माझ्यासारख्या सर्व साधकांसाठी ‘गुरुचरण’ म्हणजे परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे चरण !
– (पू.) श्री. शिवाजी वटकर, सनातन आश्रम, देवद, पनवेल. (३१.१०.२०२०)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार संतांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |